
भाडे नाकारणाऱया ऑटो रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकांपासून तुम्ही वैतागले असाल तर आता नो टेन्शन…कारण आता 1 फेब्रुवारीपासून मुंबईत रजिस्टर होणाऱयानव्या काळय़ा-पिवळय़ा टॅक्सींवर तीन रंगी ‘रूफ टॉप इंडिकेटर’ बसविण्याचा निर्णय राज्याच्या परिवहनविभागाने घेतला आहे. त्यामुळे टॅक्सीचालक भाडय़ासाठी तयार असेलतर ‘टॅक्सी फॉर हायर’ असे ग्रीन लाईट लागेल.त्यामुळे प्रवाशांचे जवळचे भाडे ऐकून ‘गॅस भरणेजा रहा हूँ, गाडी खाली नही हैं, गाडी छोडनेजा रहा हूँ’ यांसारखी टॅक्सीचालकांची डॉयलॉगबाजी आता बंद होणार आहे. काळी-पिवळी टॅक्सींना ‘रूफ टॉप इंडिकेटर’ बसविण्याबाबतचे परिपत्रक याआधीच काढण्यात आल्याचे परिवहन आयुक्त शेखर चन्नेयांनी पत्रकारांना सांगितले. ते पुढे म्हणाले, याआधीचा टॅक्सीचालकांचा अनुभव पाहता ऑटो रिक्षांकरिता अशा प्रकारचे इंडिकेटर बसविण्याची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. इतर प्रादेशिक परिवहन विभागांनी काळी-पिवळी टॅक्सींना इंडिकेटर बसविण्याची त्यांचीतारीख जानेवारीअखेर ठरवावी असे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दुसरीकडे राज्य सरकारने ऑटो रिक्षांना ‘रूफ टॉपइंडिकेटर’ बसविण्यासाठीची तारीख निश्चित करण्याचे अधिकार परिवहनआयुक्तांना दिले आहेत. मुंबईतील काळी-पिवळी टॅक्सीची संख्या –43,500 ऑटो रिक्षांची संख्या –2 लाख मुंबईसह राज्यातील टॅक्सी संख्या –65,591 राज्यातील रिक्षांची संख्या –9.75 लाख इंडिकेटर्सची आधी उपलब्धता करावी सरकारने आधी असे इंटिकेटर्स कोण बसविणार हे आधी निश्चित करावे तसेच त्यांची किंमत माफक असावी,त्याच्या किमतीवर सरकारचे नियंत्रण असावे, सरकारचजर आरटीओत हे उपकरण बसविणार असेल तरी त्याची किंमत सर्वसामान्य टॅक्सीचालकांनाही परवडणारीहवी- ए. एल. क्वॉड्रोस,टॅक्सी युनियन नेते इंडिकेटर असे असणार टॅक्सीचे इंडिकेटर्स तीन वेगवेगळय़ा रंगांमध्येअसणार आहे. हिरवा, लाल आणि पिवळा एलईडीचेदिवे त्यासाठी असणार आहेत. टॅक्सीवर जर हिरवा रंगाचा बल्ब पेटलेलाअसेल तर टॅक्सी भाडय़ासाठी तयार आहे असे समजावे तसेच जर लाल रंगाचा बल्ब पेटलेला असेलतर टॅक्सी रिकामी नाही आणि पिवळा रंग असेल तर टॅक्सी भाडय़ासाठी अनुपलब्ध आहे असे समजावे.तसेच लाईटशिवाय इंग्रजी आणि मराठी भाषेत ‘फॉर हायर’,‘हायर्ड’ आणि ‘ऑफ डय़ूटी’असे इंग्रजीत आणि मराठीतही लिहिलेले असेल.

























































