
सामना प्रतिनिधी। मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या कामातून दहावी-बारावीच्या शिक्षकांना वगळण्यात यावे अशी मागणी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्याच्या शालेय सचिवांकडे केली आहे.
दहावी-बारावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांना पेपर तपासणीचे काम करावे लागते. या पेपर तपासणीच्या कामातच निवडणूक होणार आहे. दहावी-बारावीचे शिक्षक जर निवडणुकांच्या कामात अडकले तर पेपर तपासणीचे काम रखडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या परीक्षांचे निकाल 5 जूनपूर्वी जाहीर करणे आवश्यक आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मागणी शिक्षण मंडळाने राज्याच्या शालेय सचिवांकडे केली आहे.
शिक्षकांना वगळण्याविषयी अद्याप स्पष्टता नाही
ऐन परीक्षा काळात निवडणूक आल्याने सर्वच शिक्षक संघटनांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून निवडणूक अधिकारी यांनी यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या विषयावर अद्याप स्पष्टता नाही.



























































