
>> दिवाकर शेजवळ
वेगवान, आरामदायक प्रवास, अत्याधुनिक सोयीसुविधा, सेवेला स्मार्ट स्टाफ, विविध इन्शुरन्स कव्हर्स यामुळे ‘तेजस एक्स्प्रेस’ या आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) च्या नव्या खासगी गाडीचे सध्या भारी कौतुक सुरू आहे. मात्र लखनौ ते दिल्ली धावणारी तेजस एक्स्प्रेस (८२५०२) ही गाडी त्याच मार्गावरील ‘शताब्दी एक्स्प्रेस’ (१२००४) पेक्षा भरमसाट भाडे वसूल करत प्रवाशांची केवळ पाचच मिनिटे वाचवत आहे.
वेळेच्या बचतीबद्दलचे हे वास्तव लक्षात आल्यानंतर तेजस एक्स्प्रेसने प्रवास केलेल्या प्रवाशांची विचारचक्रे फिरली आहेत. तेजस एक्स्प्रेसमधून प्रवासासाठी साधारण काळात चेअर कारसाठी १२८० रुपये आणि एाqक्झक्युटिव्ह कारसाठी २ हजार ४५० रुपये मोजावे लागतात, पण तोच प्रवास शताब्दी एक्स्प्रेसमध्ये चेअर कारसाठी एक हजार रुपये आणि एक्सक्युटीव्ह कारसाठी १ हजार ८५५ रुपये देऊन करता येतो. त्यामुळे केवळ पाच मिनिटे वाचवण्यासाठी ५०० ते ७०० रुपयांचा भुर्दंड सोसायचा कशाला, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
लखनौपासून दिल्लीपर्यंतचे अंतर ५११ किलोमीटर इतके आहे. त्या मार्गावर धावणारी शताब्दी एक्स्प्रेस ही गाडी तेवढे अंतर ६ तास ३५ मिनिटांत कापते, तर नुकतीच सुरू करण्यात आलेली तेजस एक्स्प्रेस ही लखनौ ते दिल्लीचा प्रवास सहा तास ३० मिनिटांत पूर्ण करते.
तेजसमध्ये भरघोस सवलती
ह उशिरामुळे प्रवास लांबला तर प्रत्येक प्रवाशाला १०० पासून २५० रुपयांपर्यंत भरपाई ह प्रवासात वस्तू चोरीला गेल्यास एक लाखापर्यंत विमा संरक्षण ह अपघातविमा संरक्षण ह इतर गाड्यांप्रमाणे कन्सेशन कुणालाही नाही ह रेल्वे इतर गाड्यांमधील प्रवासासाठी निरनिराळी १२० कन्सेशन्स देते. त्यात ज्येष्ठ नागरिक, कर्करोग रुग्ण, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आदींचा समावेश आहे.
लखनौ-दिल्ली मार्गावरील इतर गाड्या
१) गरीब रथ : भाडे : ४८०, प्रवास : ७ तास ३७ मिनिटे
२) सुहेलदेव : भाडे : ६४५, प्रवास : ८ तास २० मिनिटे
३) गोमती : भाडे : ७०५, प्रवास : ९ तास ०५ मिनिटे
तेजस एक्स्प्रेसला दोनच थांबे
१) गाझियाबाद (२ मिनिटे)
२) कानपूर ( ५ मिनिटे)
एकूण : ७ मिनिटे
सणासुदीच्या काळात भाड्याचा दर चढा
१८ ऑक्टोबर २०१९
चेअर कार : १ हजार ६६०
एक्झिक्युटिव्ह कार : २ हजार ४५०
२८ ऑक्टोबर २०१९
चेअर कार : ३ हजार २९५
एक्झिक्युटिव्ह कार : ४ हजार ५७०
शताब्दीला पाच थांबे
१) गाझियाबाद (२ मिनिटे)
२)अलिगढ (२ मिनिटे)
३)तुंडला (२ मिनिटे)
४)इटावा (२ मिनिटे)
५) कानपूर (५ मिनिटे)
एवूâण १३ मिनिटे




























































