मुंबई–ठाण्यात यंदा आरोग्य हंडी; रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, फळे–औषधे आणि सॅनिटायझर वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बोल बजरंग बली की जय…’, ‘जागेवाला महाराज की जय…’च्या जयघोषात निघणाऱया मुंबईतील गोविंदा पथकांची मानकी मनोऱयांची स्पर्धा यंदा कोरोनामुळे आपल्याला पहायला मिळणार नाही. परंतु सामाजिक बांधिलकीचा कसा हाती घेत मुंबई आणि ठाण्यातील अनेक गोविंदा पथकांनी यंदा ‘आरोग्याची दहहंडी’ बांधण्याचा निश्चय केला आहे. यासाठी गोकिंदा पथकांकडून मुंबईत आणि ठाण्यात रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबीर आयोजनाची महत्त्काची जबाबदारी गोविंदापटूंनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. याचाच पाया रचत मुंबईत आज 1405 गोविंदापटूंनी विक्रमी रक्तदान करीत कडक सलामी दिली आहे.

दरम्यान, समन्वय समितीच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील लक्ष्मी-चिरागनगर येथील सहयोग गोविंदा पथकाने रक्तदान व आरोग्य शिबिरासह विभागात मोफत औषध वाटप करण्याचे ठरवले आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व प्रभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने हा उपक्रम होणार असल्याची माहिती व्यवस्थापक स्वप्नील शिंदे यांनी दिली. तसेच सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव मंडळ अर्थात खोपटचा राजा गोविंदा पथकाने आजपासूनच प्रभागात रक्तदान शिबिराची सुरुवात केली असून गोपाळकाला उत्सवाच्या दिवशी प्रभागातील नागरिकांची सर्दी, ताप, खोकला आदींबाबत तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप केले जाणार असल्याचे पथकाचे समीर पेंढारे यांनी सांगितले. तर प्रभागातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटून यंदाचा आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याची माहिती महात्मा फुले नगर येथील बाळकृष्ण गोविंदा पथकाचे अध्यक्ष नीलेश मोरे यांनी दिली.

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोविंदा समन्वय समितीने गोविंदा पथकांना आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिरांचे आणि इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते.
  • ठाण्यातील सुमारे 100 हून अधिक गोविंदा पथकांकडून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, फळे वाटप, मास्क-सॅनिटायझर वाटप असे विविध उपक्रम हाती घेत आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सहयोग गोविंदा पथकाने रक्तदान व आरोग्य शिबिरासह विभागात मोफत औषध वाटप करण्याचे ठरवले आहे.
  • सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव मंडळ अर्थात खोपटचा राजा गोविंदा पथकाने आजपासूनच प्रभागात रक्तदान शिबिराची सुरुवात केली असून गोपाळकाला उत्सवाच्या दिवशी प्रभागातील नागरिकांची सर्दी, ताप, खोकला आदींबाबत तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटप केले जाईल.

    मुंबईत 1405 जणांनी केले दिवसभरात रक्तदान

    दहीहंडी समन्वय समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज दिवसभरात 1405 गोविंदांनी रक्तदान केल्याची माहिती समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी दिली.

    1 ऑगस्टपासून सुरू केलेल्या या अभियानाअंतर्गत आतापर्यंत दोन ते अडीच हजार गोविंदांनी रक्तदान केल्याची माहिती त्यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

    माझगावमध्ये 25 गोविंदा पथके एकत्र

    मुंबईतील गोविंदा पथकांमध्ये वेगळा ठसा उमटविणाऱया माझगाव ताडवाडी सार्वजनिक गोविंदा पथकानेदेखील यंदा रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. हे रक्तदान शिबीर आयोजित करताना विभागातील सर्व गोविंदा पथकांना एकत्र आणले आहे. यात जवळपास विभागातील 25 गोविंदा पथके एकत्र येणार असल्याची माहिती गोविंदा पथकाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी दिली.