मुंबईकरांनो, तीन दिवस जोरदार पावसाचे

628

मुंबईसह उपनगरात मंगळवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याचे दिसून आले. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या कोकण किनारपट्टीवर देखील आज म्हणजेच बुधवारी रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईत मंगळवारी दुपारनंतर पावसाने रौद्र रुप धारण केले होते. दुपारनंतर मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळाला. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडला. मुंबईत सांताक्रूझ येथे सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत 77 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कुलाबा येथे 22.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत 391 मिमी पाऊस झाला. तर मालवण तालुक्यात सर्वाधिक 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या