
सामना प्रतिनिधी। मुंबई
रॉक्सी आणि सेंट्रल प्लाझा सिनेमागृहाबाहेर तिकीट ब्लॅक करू न दिल्यामुळे संतापलेल्या तिकीट ब्लॅकरने मॅनेजरवर हल्ला करण्याची सुपारी एका नशेबाजाला दिली. त्यानुसार नशेबाजाने मॅनेजरच्या पार्श्वभागावर वार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी व्ही. पी. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. लुईस फर्नांडिस (45) असे या मॅनेजरचे नाव असून प्रेम सिंग (28) असे वार करणाऱयाचे नाव आहे.
इस्माईल साव (58) या तिकीट ब्लॅक करणाऱयाने ही सुपारी दिली होती. आधी रॉक्सी थिएटरमध्ये मॅनेजरचे काम करणाऱया लुईस यांची काही दिवसांपूर्वी सेंट्रल प्लाझा थिएटरमध्ये बदली झाली होती. लुईस यांना 28 टाके पडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव मोरे, पोलीस निरीक्षक राजभर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जोष्टे, पोळ अंमलदार सलीम मुजावर, सरवदे, बिडवे, पुंभार, कुमार, फुलधरन या पथकाने तपास करून इस्माईल आणि प्रेमसिंगला ताब्यात घेतले.






























































