
मुंबईतून लाखो चाकरमानी होळी, गणेशोत्सव, उन्हाळी सुटीसाठी कोकणात जात असतात. त्यांना आता एसटी, कोकण रेल्वे, खासगी वाहनांशिवाय बोटीचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो सेवा सुरू होणार आहे. रो-रोद्वारे मुंबईहून जयगड तीन तासांत तर विजयदुर्ग पाच तासांत गाठता येणार आहे.
पेंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि राज्याच्या बंदरे विभागाने या जलवाहतूक सेवेस अंतिम मंजुरी दिली आहे. या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण 147 परवानग्या मिळाल्या आहेत. जयगड आणि विजयदुर्ग येथे रो-रो उभी करण्यासाठी जेट्टीची सुविधा असून तिथून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 25 नॉट्स स्पीडची ही ‘एम टू एम’ नावाची रो-रो बोट असणार असून ती दक्षिण आशियातील वेगवान बोट असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुचारी, चारचाकी आणि मिनी बस वाहून नेण्याचीही रो-रोमध्ये क्षमता आहे. भविष्यात या ‘एम टू एम’ रो-रोला श्रीवर्धन, मांडवा असे विविध थांबे असणार आहेत.
आसन व्यवस्था
n इकोनॉमी क्लास – 552
n प्रीमियम इकोनॉमी – 44
n बिझनेस – 48
n फर्स्ट क्लास – 12
तिकिटाचे दर
n इकोनॉमी क्लास – 2500 रुपये
n प्रीमियम इकोनॉमी – 4000 रुपये
n बिझनेस क्लास – 7500 रुपये
n फर्स्ट क्लास – 9000 रुपये
n चारचाकी वाहन – 6000 रुपये
n दुचाकी वाहन – 1000 रुपये
n सायकल – 600 रुपये
n मिनी बस – 13 हजार रुपये