
अलिबाबा इनोव्हेशन इनिशिएटिव्ह बिझनेस ग्रुपच्या ‘यूसी ब्राऊझर’ आणि साहित्य व्यासपीठाने आपल्या तब्बल 13 कोटी यूजर्सना त्यांच्याच स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्याच्या हेतूने नुकतेच इन ऍप यूसी लँग्वेज फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या या फेस्टद्वारे यूसी ब्राऊझर आपल्या यूजर्सना एक समृद्ध गेमिंग अनुभव देण्यासाठी बरेच उपक्रम राबविले आहेत. यातच हा फेस्टदेखील समाविष्ट असून याद्वारे यूजर्सना लाखो रुपये कमविण्याची संधीसुद्धा मिळाली आहे. यूसी ब्राऊझरचे यूजर्स आपल्या मातृभाषेत विविध प्रकारच्या इन ऍप उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. यात हिंदी, तमीळ, तेलुगू, मराठी, गुजराती, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि पंजाबी या भाषांचाही समावेश आहे. आपल्या भाषेतील गेम्ससोबत यूसी ब्राऊझरकडून प्रत्येक नववर्षदिनी प्रत्येक भाषेत एका नशीबवान विजेत्याची घोषणा करणार आहे.



























































