मिठी नदीखालून मेट्रोसाठी भुयारीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते धारावी स्थानकांदरम्यानचा दीड किलोमीटरचा टप्पा मिठी नदीच्या खालून जाणार आहे. त्यासाठी भुयारीकरणाचे काम येत्या रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

देशात नदीच्या खालून बनवण्यात येणारे हे दुसरे भुयार आहे. यापूर्वी कोलकाता येथील मेट्रो-2 प्रकल्पासाठी हुगळी नदीच्या खालून भुयारीकरण केले गेले आहे. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसीएल) मेट्रो-3 प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी मुंबईत विविध ठिकाणी 17 टीबीएम मशीन्स जमिनीत उतरवल्या आहेत.