
शैक्षणिक वर्ष 2019 च्या प्रथम सत्रात मुंबई विद्यापीठातंर्गत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने एकूण 424 विषयांच्या परीक्षा घेतल्या होत्या. प्रथम सत्रातील एकूण परीक्षांपैकी 200 परीक्षांचे निकाल 30 दिवसांत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले आहे. तर 116 परीक्षांचे निकाल हे 45 दिवसांच्या मुदतीत लागले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ही आकडेवारी जाहीर केली असून नियोजन, तंत्रज्ञान आणि समन्वयाच्या आधारे 45 दिवसांनंतर जाहीर होणाऱया निकालांचे प्रमाण खूपच कमी झाल्याने मुंबई विद्यापीठाने समाधान व्यक्त केले आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.



























































