आयडॉलच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अॅटॅक झाल्याने दूर व मुक्त अध्ययन संस्थेने स्थगित केलेल्या अंतिम वर्षांच्या परीक्षा तसेच बॅकलॉग परीक्षा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. 21 पैकी 17 परीक्षा उद्या सुरू होणार आहेत. अंतिम वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6, तृतीय वर्ष बीएस्सी काॅम्प्युटर सायन्स, एमएस्सी भाग-2 गणित, आयटी व काॅम्प्युटर सायन्स व एमए शिक्षणशास्त्र भाग-2 या परीक्षा व बॅकलॉगच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकाॅम, बीएस्सी आयटी सत्र 4 व 5 आणि एमसीए सत्र 1 ते 5 या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. तृतीय वर्ष बीए व बीकाॅम या परीक्षा 26 ऑक्टोबरपासून ऑनलाईन सुरू होत आहेत. पदव्युत्तर वर्ष द्वितीय वर्षाच्या एमएची परीक्षा 2 नोव्हेंबर 2020 पासून तर द्वितीय वर्ष एमकाॅमची परीक्षा 6 नोव्हेंबर 2020 पासून ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.