मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाने 439 परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच परीक्षांच्या तारखांसोबतच 84 परीक्षांचे वेळापत्रकही विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5ची परीक्षा 26 ऑक्टोबर तर तृतीय वर्ष बीए व बीएस्सी सत्र 5च्या परीक्षा 30 ऑक्टोबर आणि बीए एमएमसी सत्र 5 ची परीक्षा 24 नोव्हेबरपासून तसेच बीकॉम स्वयंअर्थसहाय्य अभ्यासक्रमाच्या सत्र 5 च्या परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

439 परीक्षेच्या तारखा जाहीर
विद्यापीठाने मानव्य विद्याशाखेच्या एकूण 68 परीक्षा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या 63 परीक्षा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या 240 परीक्षा व आंतर विद्याशाखेच्या 68 अशा एकूण 439 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षा विभागातील परीक्षा व निकाल विभागाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे व त्यांच्या विभागाने या परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार केले असून ते तयार करताना त्या त्या विद्याशाखांचे 90 दिवसांचे सत्र, सुट्टय़ा व इतर विविध व्यावसायिक परीक्षा याचाही विचार करून या तारखांचे वेळापत्रक तयार केले आहे.