मुंबईत लसीकरण वेगात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड लढाईत लसीकरण हे मुख्य अस्त्र्ा बनले आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने ठिकठिकाणी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. दररोज हजारो मुंबईकरांचे लसीकरण होत असून या मोहिमेने वेग घेतला आहे.

शिवसेना उपविभागप्रमुख दिनेश राव आणि शाखा क्रमांक 50 च्या वतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जसलोक रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित या शिबिराला शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विभाग संघटक-नगरसेविका साधना माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत घाटकोपरच्या राष्ट्रीय शाळेमध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या लसीकरणाकरिता महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, सहसचिव रंजना नेवाळकर, आरोग्य अधिकारी महेंद्र खंदारे, माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी, सचिन भांगे व मोठय़ा प्रमाणात मनपा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

ईशान्य मुंबई विभाग 8 मधील गोवंडी, शिवाजीनगर, देवनार, घाटकोपर पुर्व आणि पश्चिम येथे तब्बल14 हजार नागरीकांना विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येत आहे. या शिबीरास संजय मशिलकर व युवासेना सहसचिव मंदार चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले असुन हे शिबीर यशस्वी करण्यासाठी विभागसंघटक डॉ.भारती बावदाने यांच्या सहीत प्रभाग समिती अध्यक्ष विठ्ठल लोकरे व स्नेहल मोरे, नगरसेवक परमेश्वर कदम, सुरेश पाटील, समिक्षा सक्रे, अश्विनी हांडे, अर्चना भालेराव, समन्वयक संजय भालेराव, माजी नगरसेवक दिपक हांडे, उपविभागप्रमुख तात्या सारंग हे मेहनत घेत आहेत.