
कोरोनाच्या महामारीमुळे फक्त उद्योगधंद्यांनाच खीळ बसली असे नव्हे तर सगळ्यांच्या जगण्याच्या पद्धतीवरही याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना वर्क प्रॉम होम करावे लागत असून शारीरिक हालचाली कमी झाल्याने मानसिक आरोग्यावर परिमाण झाल्याची माहिती टाटा सॉल्ट लाईटच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
लॉकडाऊनमुळे इतक्या वर्षांचे ठरलेले दिनक्रम अचानक पूर्णपणे बदलले त्यामुळे लोकांना घरून काम व घरातील काम अशी तारेवरची कसरत करावी लागत आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून एका आठवडय़ात मानसिक आरोग्यासंदर्भात नोंद करण्यात आलेल्या केसेसची संख्या 20 टक्क्यांनी वाढल्याचे सर्वेक्षणात असे निदर्शनास आले. सर्वेक्षणात 60 टक्के व्यक्तींनी असे मान्य केले की त्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी देखील काम दिले गेले. तर 66 टक्के लोकांनी सांगितले की त्यांचे काय-फाय कनेक्शन अचानक बंद पडले तर त्यांना राग येतो. तर 51 टक्के व्यक्तींनी मान्य केले की त्यांचा फोन चार्ज होत असताना कोणी तो अनप्लग केला तर त्यांचा रागाचा पारा चढतो.























































