
अंधेरीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यमुना बापू सदडेकर यांचे नुकतेच वयाच्या 87 व्या वर्षी त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन सदडेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंधेरीच्या नवकिरण मंडळ या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा संघटनेच्या स्थापनेत दिवंगत यमुनाताई यांचे मोठे योगदान आहे. लेखक ल. ना. केरकर यांच्या त्या भगिनी. त्यांच्या अंत्ययात्रेत आमदार भारतीताई लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, शाखाप्रमुख सुधाकर अहिरे, राष्ट्रवादीचे प्रदीप टपके व असंख्य वृत्तपत्र विव्रेते व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी 23 फेब्रुवारी रोजी वर्सोवा येथे व बारावे व तेरावे 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.



























































