
सामना प्रतिनिधी। मुंबई
मी टू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱयात अडकलेले संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांच्यासाठी यशराज स्टुडिओचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी मी टू प्रकरणामुळे बॉलीवूडची काळी बाजू सर्वांसमोर आली होती. अनेक महिलांनी अनु मलिक यांच्यावरही लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या आरोपांमुळेच अनु मलिक यांना इंडियन आयडॉल या शोमधून काढून टाकले होते. लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱया व्यक्तींच्या विरोधात यशराज स्टुडिओ नेहमी असते. स्टुडिओचे वरिष्ठ अधिकारी आशीष पटेल यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप असल्यामुळे स्टुडिओने त्यांना पदावरून हटवले होते. त्यामुळे आता अनु मलिक यांनाही स्टुडिओत प्रवेशास बंदी घातल्याचे वृत्त आहे.





























































