
मुंब्रा येथील कौसा परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या वादातून कोयता, चाकू आणि अन्य शस्त्राने एकाच कुटुंबातील तिघा जणांवर वार करण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. श्रीलंका देवरीपाडा येथील समीउल्ला हकीकउल्ला खान हे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी असताना घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी राहणारे सलाउद्दीन बलबले यांच्याशी वाद झाला. बलबले यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर धारदार हत्याराने प्रहार करण्यात आला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




























































