मुंब्रावासियांचे लाड बंद, उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत लॉकडाऊन; चिकन, मटणही घरपोच

3113

रमजान महिन्यात तणाव नको म्हणून मुंब्रावासियांचे सुरू असलेले लाड ईदनंतर पूर्णपणे बंद होणार आहे. मुंब्य्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने उद्या 27 मेपासून शहरात कडकडीत लॉकडाऊन जाहिर केला आहे. औषधे आणि दूध वगळता सर्व दुकानांचे शटर डाऊन करण्यात येणार असून भाजी, मासळी, चिकन, मटण बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे. इतकेच नव्हेतर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी  सकाळी केवळ 7 ते 9 या वेळेतच औषधे आणि दूधाची दुकाने खुली राहणार आहेत.

ठाणे महापालिका प्रशासनाने वागळे, लोकमान्यनगर, कोपरी, नौपाडा येथे कडकडीत लॉकडाऊन जाहिर केला आहे. मात्र कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंब्य्रात पहिल्या दिवसापासूनच लॉकडाऊनचा फज्जा उडालेला दिसला. दाटीवाटीने थाटलेल्या दुकांनांमध्ये, बाजारामध्ये शेकडे नागरीक बिनधास्तपणे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत गर्दी करत आहेत. परिणामी मुंब्य्रात कोरोना बाधितांचा आडका 300 च्या घरात पोहचला आहे. रमजानच्या काळात कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षणीय वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मुस्लीम बहूल परिसर असल्याने धार्मिक तणाव नको म्हणून पालिकेने त्याकडे कानाडोळा केला. मात्र आता वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उशीरा का होईना पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी येथे 27 मेपासून बेमुदत काळासाठी कडकडीत लॉकडाऊन जारी केला आहे.

‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान

कडक बंदोबस्त
कडकीत लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी मुंब्य्रात कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.  त्यासाठी शहरातील पोलिसांची जादा कुमक येथे वळवण्यात आली असून लॉकडाऊन तोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पाकिला उपायुक्त  मनिष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिला आहे.

चिकन, मटण घरपोच
अत्यावश्यक सेवा म्हणून सूट देण्यात आलेली किराणा, भाजीपाला दुकानेही लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे बंद राहणार आहे. याकाळात गैरसोय होऊ नये यासाठी किराणा, भाजीपालासह मासळी, चिकन, मटण घरपोच देण्यास मुभा देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या