कोल्हापुरात तरुणाचे मतदानासाठी हटके प्रबोधन, 14 वर्षीय अर्हन मिठारीची संगीतमय धून ऐकवून मतदारांना साद

राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या मतदानासाठी आता अवघे पाच ते सहा दिवस उरले आहेत. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भीडपणे योग्य उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन एका 14 वर्षीय तरुणाकडून कोल्हापुरात केले जात आहे. या तरुणाचे नाव अर्हन मिठारी असे आहे.

अर्हन मिठारी हा सॅक्सोफोनद्वारे मतदारांचे प्रबोधन करत आहे. आपल्या गळ्यात अडकवलेला सॅक्सोफोन, त्यावर वाजणारी संगीतमय धून आणि मतदारांचे प्रबोधन करणारा फलक लावून मतदारांना अर्हन मिठारी साद घालताना चौकाचौकात दिसत आहे. मतदारांनाच निवडणुकीच्या काळात जेवण, पैसे आणि इतर आमिष दाखवून उमेदवारांकडून मत विकत घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. मतदारांनी आपली मते विकू नये, यासाठी अर्हन कोठारी मतदानासाठी जनजागृती करत आहे.