
सामना प्रतिनिधी । गेवराई
गेवराई तालुक्यातील नागझरी नवीन येथे झालेल्या भांडणाचे पर्यवसान खूनात झाले. तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक भाऊ ठार तर सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
नागझरी येथे गुरूवारी सकाळ पासूनच पारधी समाजातील दोन कुटुंबात वाद सुरु होता. या वादात उत्तरेश्वर भारत पवार वय ३५ हा जागीच ठार झाला, तर त्याचा सख्खा भाऊ नारायण भारत पवार हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मयत उत्तरेश्वर पवार याच्या डोक्यात व छातीवर तलवारीने वार झाल्याचे समजते.
























































