गंगापूर तालुक्यातील सिरजगाव परिसरात वडगावच्या तरुणाची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गंगापूर तालुक्यातील सिरेसायगाव शिवारात वडगाव कोल्हाटी येथील एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सुनील देवीदास शेजूळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हाद्दीत असलेल्या सिरेसायगावातून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह पडला असल्याची माहिती गामस्थांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. हत्या झालेला तरुण वडगाव कोल्हाटी येथील असून त्याचे नाव सुनील देवीदास शेजूळ आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी दोन धारदार चाकू जप्त केले आहेत. सुनील या ठिकाणी कशासाठी आला होता. तसेच त्याची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचा तपास सिल्लेगाव पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिंडे बारहाते, पोलीस कॉन्स्टेबल दाटबळे गैलोत यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.