
सामना ऑनलाईन, पणजी
गोव्यात दुचाकी भाड्याने वापरायला मिळतात. या दुचाकी भाड्याने देणाऱ्या एका व्यक्तीचा तलवारीचे वार करत खून करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी भाड्याने देण्यावरूनच हा वाद झाला होता. विश्वजीत सिंह असं मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
विश्वजित सिंह हा कांदोळी भागात एक हॉटेल चालवत होता शिवाय दुचाकी भाड्यानेही देत होता. त्याच्याकडून काही तरुणांनी बाईक भाड्याने घ्यायचं ठरवलं होत. काही कारणामुळे या तरुणांमध्ये आणि सिंहमध्ये वाद झाला, ज्यामुळे तरुणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांना अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाहीये.

























































