मुस्लिम आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून मुस्लिम समाजाला सर्व सोयीसुविधा देण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधान परिषदेत उपप्रश्नाला उत्तर देताना दिली.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 9 जुलै 2014 च्या शासन अध्यादेशाप्रमाणे मुस्लिम समाजासाठी नोकरीमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, या अध्यादेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने न्यायालयाने 14 नोव्हेंबर 2014 रोजी अंतरिम आदेशान्वये शैक्षणिक आरक्षण कायम ठेवले. या शैक्षणिक आरक्षणान्वये 354 विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फायदा मिळाला आहे आणि तो भविष्यातही मिळत राहणार आहे, अशी माहिती विश्वजीत कदम यांनी दिली.