सिंहगड रस्त्यावर कालवा फुटल्याने पूरसदृश स्थिती, नागरिकांचा महापौरांना घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे शहरातून वाहनारा खडकवासला धरणाचा मोठा उजवा कालवा पर्वती लगतच्या जनता वसाहतीजवळ भगदाड पडल्याने पाणी घुसून घरातील सामान वाहून गेले. प्रचंड पाण्याचा लोट सिंहगड रस्त्यावर आल्याने रस्त्यावरील चार चाकी वाहने, दुचाकी गाड्या वाहून गेल्या या घटनेने प्रचंड घबरात उडाली असून, परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे.

EXCLUSIVE- सिंहगड रस्त्यावर मुठा कालवा फुटला, लाखो लीटर पाणी वाया

पाण्याचा लोट एव्हडा प्रंचड होता की, घरातील गॅस सिलेंडर, डबे अन्य साहित्य आंबिल ओढ्यातून मुळा मूठा नदीपर्यंत वाहून गेले. फुटलेल्या कालव्याचे पाणी दांडेकर पुलावरून मांगीर बाबा मंदीरापर्यंत गेले. त्यामुळे रस्ता बंद करावा लागला. जनता वसाहतीतील सव्र्हे नं. 130 या झोपडपट्टीत पाणी शिरले त्यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. घर सोडून लोक पळत सुटले.

कालवा फुटण्याची माहिती मिळताच जलसंपादन आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पाणी वहात असलेल्या भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. कालव्यातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून या भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. या परिसरातील शाळा सुटल्याने विद्याथ्र्यांना आणण्यासाठी गेलेल्या स्कूल व्हॅन पोहचल्या नाही, पालकही अडकगून पडले आहे. डेक्कन, सिंहगड रस्ता, सारसबाग, टिळकरोड, पर्वती, सदाशीवपेठ, स्वारगेट परिसरात वाहतूक कोंडी झाली असून गोंधळ उडाला आहे.

महापौरांना घेराव

जनता वसाहत परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नगरसेवक आणि महापौर उशिरा पोहोचले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांपैकी काही जणांनी महापौर मुक्ता टिळक यांना घेराव घातला. नागरिकांचा संताप पाहून महापौरांनी तेथून काढता पाय घेतला.

summary-mutha canal broke down at pune