
वर्ध्यातील मुथूट फिनकॉर्न फायनान्स कंपनीच्या कार्यालयात गुरुवारी अज्ञात आरोपीने चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवित दरोडा टाकला होता. वर्धा गुन्हे शाखेने आरोपींना गडाआड करण्यात पोलिसांना यश आले.
व्यवसायात झालेल्या कर्जबाजारीपणामुळे कट रचून हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. एवढंच नव्हे तर या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा बँकेचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले आहे. त्याच्या आणखी चार मित्रांसह त्याने दरोड्याचा कट रचला होता. दरोड्यात पळविलेल्या 9 किलो 600 ग्रॅम सोन्यापैकी पोलिसांनी अडीच किलो सोनं जप्त केले. पोलिसांनी 2 किलो 500 ग्रॅम वजनाचं सोनं, सहा मोबाईल, बंदुक, कार असा 4 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या दरोड्यामध्ये 9 किलो वजनाचे सोने व नगदी तीन लाख घेऊन शाखेतील महिला कर्मचारी दीपिका हिंगे या महिलेची ज्यूपिटर क्रमांक एम एच 32 झेड 1070 या दुचाकीने पसार झाले होते.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने फायनान्स कंपनीत असलेल्या व्यवस्थापकाची सखोल चौकशी केली असताना या दरोड्याचा मास्टरमाईंड व्यवस्थापक असल्याचे समोर येताच,माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले.
त्यांनी आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून फायनान्स कंपनीतून नेलेले सोने,व रोख. सहा मोबाईल. दोन चारचाकी वाहन क्रमांक एम एच 29 बी ए 1999 व एम एच 29 बी सी 8388 ही दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केले. तर फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक महेश अजाबराव श्रीरंग (वय 35, रा उमरेड रोड नागपूर), कुशल सरदाराम आगासे (वय ३२, रा यवतमाळ), मनीष श्रीरंग घोळवे (वय ३५, रा यवतमाळ), जीवन बबनराव गिरडकर (वय ३६, रा. यवतमाळ), कुणाल धर्मपाल शेंद्रे (वय 36, रा यवतमाळ) या पाच आरोपींना अटक केली आहे.
आरोपीने पळविलेली दुचाकी पोलीस ठाण्या जवळून जप्त करण्यात आली आहे. अक्षय दिलीप खेरडे रा बँक ऑफ इंडिया कॉलनी वर्धा यांच्या तक्रारीवरुन 1484/2020 कलम 452,342 व 392 भादवी सहकलम 3,4,25 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे,सलीम कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, अनिल कांबळे व इतर सहकारी यांनी केली आहे.
दोन आठवड्यापासून रचला होता दरोड्याचा कट
शहरात मध्यवर्ती भागात दरोडा घालण्यात आला होता. त्या दरोडा घालण्याचा कट दोन आठवड्यापुर्वी रचला असल्याचे तपासात समोर आले आहे. आणखी या मागचा सूत्रधार कोण आहे.याचा शोध पोलीस घेत आहे.
घर बांधकाम आणि कर्ज असल्याने टाकला दरोडा
महेश अजाबराव श्रीरंगे याने गेल्या पंधरा वर्षांपासून गोल्ड लोन या विविध कंपनी मध्ये काम केले आहेत. त्याला सोने कुठे ठेवले जाते याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे त्याने या दरोड्याचा प्लॅन रचला होता. त्यामध्ये पाचही आरोपींवर घर बांधकामा करिता घेण्यात आलेले खाजगी बँकेचे कर्ज व इतर कर्ज असल्यामुळे यांनी शहरातील मुत्थूट फायनान्स कंपनी मध्ये दरोडा घालण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुला पोलीस अधिक्षकांनी दिले बक्षीस
गुरुवारी सकाळच्या सुमारास मुत्थूट फायनान्स कंपनी मध्ये दारोडा टाकण्यात आला असता, पाच आरोपींना ताब्यात घेऊन सोने, रोखस वाहने, मोबाइलसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिवसा ढवळ्या शहरात दरोडा घालण्याचा अज्ञात चोरट्यांकडून प्रयत्न झाला असता, जिल्ह्यातील नागरिकांमध्ये हा संदेश वाऱ्यासारखे पसरला. स्थानिक गुन्हे शाखेची टिम महत्वपुर्ण काम केल्यामुळे त्यांना पोलिस अधीक्षक यांनी ३५ हजा
या प्रकरणातील आरोपी जीवन गिरडकर याच्याविरुद्ध यापूर्वी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. तर आरोपी कुशल आगासे याचे मेडीकल शॉप होते. पण या व्यवसायात त्याला नुकसान सहन कराव लागल होत. अशातच या पाचही आरोपींनी आपल्यावर कर्जाचे डोंगर कमी करण्यासाठी हा दरोडा टाकण्याचा कट रचला.
फायनान्स कंपनीच्या ठेवीदारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता संय्यम बाळगावा. सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षीत असून कायदेशीर कार्यवाही पूर्ण केल्यावर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यात येईल.
– प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक वर्धा.
राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते सत्कार
मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स वर्धा येथील 9 किलो सोने व नगदी 3,10,000/- रु.दरोड्यामधील आरोपींना 12 तासाच्या आत अटक करुन त्यांचेकडुन 4 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्येमाल जप्त केल्याबाबत. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, नगरविकास व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री व जिल्हाधिकारी, विवेक भिमनवार यांच्याकडून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.




























































