
क्रिकेटमधील कारकिर्द संपल्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी राजकारणात पदार्पण केलं आहे. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू व श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने देखील याच क्रिकेटपटूंच्या पाऊलांवर पाऊल ठेवले आहे. मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष गोटाबाय राजापक्षे यांनी मुरलीधरनची नियुक्ती केली आहे. त्यांनी स्वत: मुरलीधरनला आमंत्रण पाठवून हे पद स्वीकारण्यास सांगितले होते. त्यांच्या या आमंत्रणाचा मुरलीधरनने स्वीकार केला आहे.
Sri Lankan spin king Muttiah Muralitharan to be appointed as governor of Tamil-dominated Northern Province
— Press Trust of India (@PTI_News) November 27, 2019
मुरलीधरन यांची उत्तर प्रांतासाठी, अनुराधा यहामपाथ यांची पूर्व प्रांतासाठी व तिस्सा विथाराना यांची उत्तर मध्य प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्राध्यक्षांनी परिपत्रक काढून त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात हे तिनही राज्यपाल त्यांच्या पदांचा पदभार स्वीकारणार आहेत.

जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज असलेल्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2010 साली निवृत्ती घेतली आहे.
























































