पद्मनाभस्वामी मंदिरातील सोन्याच्या रॉडचे गूढ वाढले!

केरळमधील ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिरात एक अजब घटना घडली. मंदिरातून गायब झालेला सोन्याचा एक रॉड काही दिवसांनी मंदिराच्या परिसरातच वाळूत गाडलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये काही दिसलं नाही किंवा दरवाजा उघडला नाही… मग हे घडलं कसं? भाविकांना याला चमत्कार मानत, भगवान विष्णूंनी आपली मौल्यवान वस्तू स्वतः परत आणल्याचा दावा केला आहे.

ही घटना 27 एप्रिलपासून सुरू झाली. मंदिराच्या गर्भगृहातील दरवाज्यांची दुरुस्ती सुरू होती. याअंतर्गत 12 सेंटिमीटर लांबीचा सोन्याचा वेल्डिंग रॉड तयार करण्यात आला होता. हे काम बुधवारी पूर्ण झाले आणि सर्व सोन्याचे साहित्य कपड्याच्या पिशवीत ठेवून स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. परंतु, शनिवार सकाळी पिशवी उघडल्यावर रॉड गायब असल्याचे आढळली. यामुळे एकच खळबळ उडाली. रविवारी रॉड मंदिराच्या परिसरातील वाळूत गाडलेले आढळले. विशेष म्हणजे, सीसीटीव्हीमध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसून आला नाही आणि स्ट्राँग रूमचे कुलूपही तुटले नव्हते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.