
स्पेनच्या राफेल नदालने जागतिक एटीपी टेनिस मानांकनात पुन्हा टॉपवर राहण्याचा पराक्रम केला आहे. १७ ग्रँडस्लॅम जेतीपदे पटकावणाऱ्या राफेलने पुन्हा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला बरेच मागे सोडत पुरुष मानांकनात आपले नंबर वन स्थान कायम राखले आहे.
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने १० व्या स्थानावर मजल मारली असून त्याची ही भरारी ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी त्याला उत्साहवर्धक ठरणार आहे. यंदा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने कारकिर्दीत १३ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे पटकावली आहेत.
यंदाच्या एटीपी जागतिक टेनिस मानांकनाचे टॉप टेन स्टार –
१) राफेल नदाल (स्पेन) – ९३१० गुण
२) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड ) – ७०८०
३) अलेक्झांडर झेरेव्ह (जर्मनी) – ५,६६५
४) जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेन्टिना) ५,३९५
५) केविन अँडरसन (रशिया) – ४,६५५
६) ग्रिगोर दिमित्रोव्ह (बल्गेरिया) – ४,६१०
७) मरीन सिलीक (क्रोएशिया) – ३,९०५
८) डोमिनिक थिएम (ऑस्ट्रिया) – ३,६६५
९) जॉन इसनेर (अमेरिका) – ३,४९०
१०) नोवाक जोकोविच (सर्बिया) – ३,३५५




























































