
नड्डा यांच्या पत्नीची महागडी फॉर्च्यूनर एसयूव्ही कार चोरण्यासाठी सर्व आरोपी महागडय़ा क्रेटा कारमध्ये बसून गेले होते. कारचालक जोगिंदर यांनी दिल्लीतील गोविंदपूर येथील सर्विस सेंटरमध्ये कार नेली होती.तिथून कार चोरीला गेली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या पत्नीची कार दिल्लीतून चोरीला गेली होती. ही कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सापडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. मोदींच्याच मतदारसंघात ही कार सापडल्याने या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, अशी चर्चा सुरू आहे. दिल्लीतील गोविंदपुरी भागातील सर्विस सेंटरमधून ही कार चोरीला गेली होती. चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे चोरटय़ांनी या कारची नंबर प्लेट ही बदलली होती. आरोपींनी कार सह अलीगढ, लखिमपूर खिरी, बरेली, सीतापूर, लखनौमार्गे वाराणसी गाठली. ही कार नागालँडला पाठवण्याचा आरोपींचा डाव होता.




























































