नदीम खान ‘मुंबई उपनगर श्री’ चा मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान व बृहन्मुंबई उपनगर जिल्हा हौशी शरीरसौष्ठव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार तुकाराम काते व विस्तारक तुषार काते यांनी आयोजित केलेल्या ‘मुंबई उपनगर श्री’चे उद्घाटन शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते चेंबूर येथे दिमाखात पार पडले. या स्पर्धेत नदीम खान हा ‘मुंबई उपनगर श्री’चा मानकरी ठरला.

या स्पर्धेत ‘बृहन्मुंबई उपनगर उदय’, ‘उपनगर श्रीमान’, ‘उपनगर किशोर’, ‘उपनगर कुमार’, ‘उपनगर मेन्स फिटनेस’, ‘उपनगर श्री’ पटकावणाऱ्या शरीरसौष्ठवपटूंना शिवसेना विभागप्रमुख मंगेश सातमकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत उज्ज्वल सिंग (उदय श्री), किरण राजपूत (श्रीमान श्री), अश्विन दिवेकर (मेन्स फिटनेस), अटमल्स मर्चंट (कुमार श्री) यांनीही अफलातून शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा हौशी शरीरसौष्ठव मंडळाचे अध्यक्ष दरेकर, शाखाप्रमुख संजय राठोड, राजेश भोगले, अविनाश शेवाळे, युवासेना सहसचिव नीलेश गवळी, किरण लोहार, मुंबई समन्वयक सचिन भोसले, विभाग अधिकारी सचिन खेतल हे मान्यवर उपस्थित होते