नागपूरकरांनी दत्तक घेतले बिबट्याचे तीन बछडे

635

वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे यासाठी राज्यशासनाने वन्यपशू दत्तक योजना सुरु केली आहे. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात चार बिबट्यांचे बछडे आले होते. त्यातील 3 बछडे नागपूरकरांनी दत्तक घेतले असल्याची माहिती गोरेवाडा प्रकल्पाच्या विभागीय व्यवस्थापकांनी दिली.

त्यात डॉक्टर आयुषी आशिष देशमुख यांनी एक बिबट पिल्लू (मादी) दत्तक घेतले असून त्याचे नामकरण हंटर असे केले आहे. तर डॉक्टर रोशन भिवापूरकर यांनी एक मादी पिल्लू दत्तक घेतले असून त्या याचे नामकरण डायना असे केले आहे. ए आर कोन्स्ट्रक्शन यांनी नार पिल्लू दत्तक घेतले असून त्याचे नाव मुफासा असे ठेवले आहे. अजून एक बिबट शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय वाघ, बिबट आणि अस्वल या प्राणिसंग्रहालयात दत्तक योजने अंतर्गत उपलब्ध आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या