कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

नगर तालुक्यातील वाळकी येथे कर्जबाजारी झाल्याने बाबासाहेब घोडके ( 55) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, मुले व पत्नी भाऊ असे कुटुंब आहे. दरम्यान, या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबासाहेब आज पहाटे आपल्या शेतात गेले होते. सकाळी घरच्यांनी त्यांच्या मोबाईल वर संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे त्यांनी शेतात जाऊन पहिले बाबासाहेब तेथे बेशुद्धावस्तेत आढळले. तसेच त्यांच्या बाजूला कीटक नाशकाच्या दोन बाटल्याही होत्या. या घटनेची माहिती कुटुंबांने गावकर्‍यांना दिल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्या संदेश कार्ले यांच्यासह गाावकर्‍यांनी बाबासाहेबांना रुग्णालयात दाखल नेले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बाबासाहेबांवर जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीय बँकेचेही कर्ज आहे. दोन मुली,मुले व पत्नी भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे. वाळकी परिसरात ते अनेकांना परिचित होते. गेल्या काही दिवसांपसून ते आर्थिक विवंचनेत होते. तर दुसरीकडे जनावरांना चारा मिळावा यासाठी छावण्या उघडा अशी मागणी त्यांनी शिवसेनेचे कार्ले यांच्याकडे केली हेाती अशी आठवणही कार्ले यांनी यावेळी सांगितली. सामाजिक कार्यातही त्यांचा कायम सहभाग असे. परंतु सततचा दुष्काळ व नापिकीला ते कंटाळले होते. मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानांही त्यांनी हजेरी लावली होती.