विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

402
crime

कोपरगाव येथे मारुती अल्टो कार मधून विदेशी दारू विनापरवाना बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी दोन जणांना अटक लाल रंगाच्या मारुती अल्टो कारसह दोन कॉटर असा पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 29 रोजी सायंकाळी 7.15 वाजता कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील मुख्य चौकात आरोपीत मजकुर यांनी सुदेश सिनेमा गृहासमोर रोडवर कोपरगाव येथे त्याच्या ताब्यातील लाल रंगाच्या मारुती अल्टो कारमध्ये विदेशी दारुची विनापरवाना बेकायदा वाहतुक करतांना तसेच भरधाव वेगात व धोकादायक रित्याने दारु पिऊन रस्त्यावर चालवितांना मच्छिंद्र काशिनाथ लोणारी आणि बाळासाहेब ठमाजी संवसरकर हे दोघे मिळून आले. त्यांना मुद्देमालासह अटक करण्यात अटक करून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. या ठिकाणी पोका /864 अंबादास रामनाथ वाघ धंदा नोकरी नेम कोपरगाव शहर पोस्टे ज्यांनी फिर्याद दिली असून वरील दोन्ही आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलिसात गु.र.नं.कलम – 422/2019 मुं.दा.का.कलम 65(अ) व मो वा कयदा कलम 185,184/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोना 2173 बी.एस.कोरेकर नेम. कोपरगाव शहर पोस्टे करीत आहेत दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या