
सामना प्रतिनिधी। कोल्हार
जम्मू-कश्मीरात आणखी एक जवान शहीद झाला. नगर जिह्यामधील राहता तालुक्यातील राजुरी येथील जवान अनिल विष्णुपंत गोरे (35) हे लेह-लडाखमध्ये शहीद झाले. शेतकरी कुटुंबातील शहीद जवान अनिल यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजुरी आणि परिसरात शोककळा पसरली. शहीद जवान अनिल गोरे यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची मुलगी, आजी, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणले जाणार असून तेथून लष्कराच्या वाहनाने राजुरी गावात पोहोचेल.






























































