
विधान परिषदेच्या आठ जागांची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी संपणार आहे. याठिकाणी तत्पूर्वी निवडणूक होणार असल्याने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्यातील आठ जिह्यांतील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपालिकेतील नगरसेवकांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने संबंधित जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱयांना दिले आहेत. यामुळे विधान परिषद निवडणूक होणाऱया जिह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, सभापती आणि नगरसेवकांच्या नजरा इच्छुक उमेदवारांकडे लागल्या आहेत.
राज्यातील मुंबई शहर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, वाशिम, नागपूर आणि नगर जिह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेची मुदत 1 जानेवारी 2022 संपणार आहे. त्यापूर्वीच या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे. नगरमधून विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांना दोन वेळा संधी मिळालेली असून, डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार की महाविकास आघाडी करून नवा चेहरा पुढे केला जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नगर जिह्यात 500हून अधिक मतदार
विधान परिषदेसाठी जिह्यात 500 हून अधिक मतदार आहेत. मुदत संपलेल्या पाच नगरपरिषदांतील सदस्य वगळले तरी 396 च्या जवळपास सदस्य मतदार आहेत. यात नगर महापालिकेचे 72, जिल्हा परिषदेचे 69 सदस्य आणि 14 पंचायत समिती सभापती हे सर्वाधिक मतदार आहेत. श्रीरामपूर, कोपरगाव आणि संगमनेर नगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे मतदार आहेत.
‘त्या’ नगरसेवकांच्या पात्रतेबाबत अस्पष्टता
जिह्यातील पाच नगरपरिषदांची मुदत संपत आली असून, या ठिकाणी असणाऱया नगरसेवकांच्या मतदान पात्रतेचा मुद्दाही अद्यापि स्पष्ट नाही. एखाद्या निवडणुकीसाठी 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे मतदानासाठी पात्र असल्यास त्या निवडणुका होतात. यामुळे जिह्यातील पाच नगरपरिषदांतील नगरसेवकांची मुदत संपलेली असल्याने निवडणुकीसाठी अपात्र ठरली तरी त्याचा विधान परिषद निवडणुकीवर परिणाम होणार नाही, हे निवडणूक कायदेतज्ञांचे मत आहे. मात्र, याचा राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. यातील बहुतांश नगरपालिका राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यातील आहेत.






















































