
सामना प्रतिनिधी । नगर
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान महापौर सुरेखा कदम या प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवारी लढवत आहेत. त्यांच्या समवेत शिवसेनेची चार नगरसेवक असून यामध्ये बोराटे, कावरे, लोखंडे यांचा समावेश आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमली होती.






















































