
शहरातील तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गंभीर गुह्यांत फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. बंटी उर्फ भावेश अशोक राऊत (वय 30, रा. माणिक चौक, नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बंटी राऊत याने 2 नोव्हेंबर रोजी रोहित प्रवीण चंगेडिया यांची गाडी अडवून त्यांना लाथा-बुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करत धमकी दिली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. बंटी राऊत तपोवन रोडवरील एका फ्लॅटमध्ये लपल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. पथकाने सापळा लावून बंटी राऊत याला ताब्यात घेतले. बंटी राऊत याच्याविरुद्ध कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार, गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक मनोज कचरे, हेडकॉन्स्टेबल सतीश भांड, गणेश धोत्रे, पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, इस्राईल पठाण, कॉन्स्टेबल सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, संदीप थोरात, अमोल गाढे या पथकाने ही कारवाई केली.





























































