मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेचे 32 उमेदवार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

पाडव्याच्या मुहूर्तावर 19 उमेदवारांची यादी जाहीर करत आज आम्ही 13 शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, युती बाबतची बोलणी वरिष्ठ पातळीवर चालू असली तरी मात्र, जे उमेदवार जाहीर केले आहेत, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे उपनेते राठोड यांनी स्पष्ट केले.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवोसेनेचे जिल्हाअधिकारी विक्रम राठोड, नगरसेवक अनिल शिंदे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, गिरीष जाधव आदींहसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी उपनेते राठोड म्हणाजे की, शिवसेनेने अत्तापर्यंत 32 जणांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने पहिल्या पासूनच नियोजन करुन निवडणूकी संदर्भातली तयारी केली आहे. वरिष्ठ पातळीवर युती बाबतची बोलणी सुरु आहे. मात्र, जी यादी आम्ही जाहीर केली त्यामध्ये आता कोणातही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच टप्प्याटप्प्यात उर्वरीत नावे जाहीर करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेना निश्‍चितच अग्रक्रमाणे राहील व आम्ही बहुमतापर्यंत पोहोचू असेही ते म्हणाले, युती होईल की नाही याबाबत आम्ही ठाम सांगू शकत नाही, हा निर्णय वरिष्ठ पातळीरचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक प्रक्रियेत आघाडी घेणार्‍या शिवसेनेने शनिवारी 13 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात सर्व नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेने आत्तापर्यंत 32 उमेदवार जाहीर केली असून पाच प्रभागांमध्ये चारही जागांवर उमेदवार दिले आहेत. तर येत्या सोमवारी शिवसेनेकडून तिसरी यादी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

येत्या निवडणुकीत शिवसेना बहुमत निश्‍चित मिळवेल. उर्वरीत उमेदवारही लवकरच जाहीर होतील, असेही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेकडून यादीत जाहीर झालेले उमेदवार..

प्रभाग 1 – दिपाली बारस्कर (सर्वसाधारण महिला), प्रभाग 1 ड – डॉ. चंद्रकांत हनुमंत बारस्कर ,प्रभाग 2 ब – प्रियांका रघुनाथ तवले (कराळे), प्रभाग 4 – योगीराज गाडे (सर्वसाधारण), प्रभाग 5 – कलावती शेळके (ओबीसी महिला), प्रभाग 6 ड – रवींद्र विलास वाकळे, प्रभाग 7 – अशोक बडे (ओबीसी), प्रभाग 7 ड – अक्षय लोभाजी कातोरे, प्रभाग 7 – कमल सप्रे (सर्वसाधारण महिला), प्रभाग 7 अ – रिता शैलेश भाकरे , प्रभाग 8 क – सचिन चंद्रशेखर शिंदे , प्रभाग 8 ड – शाम किसन नळकांडे , प्रभाग 8 – रोहिणी संजय शेंडगे (अनुसूचित जाती महिला), प्रभाग 8 – पुष्पा अनिल बोरुडे (ओबीसी महिला), प्रभाग 9 – सुरेश तिवारी (सर्वसाधारण), प्रभाग 12 – बाळासाहेब बोराटे (ओबीसी), प्रभाग 12 ब – मंगल सुनील लोखंडे , प्रभाग 12 – सुरेखा कदम (सर्वसाधारण महिला), प्रभाग 12 – दत्तात्रय कावरे (सर्वसाधारण), प्रभाग 13 – उमेश कवडे (ओबीसी), प्रभाग 13 – सुभाष लोंढे (सर्वसाधारण), प्रभाग 13 ब – संगीता महेंद्र बिज्जा, प्रभाग 13 क – सुवर्णा संजय गेणप्पा, प्रभाग 14 – भगवान फुलसौंदर (ओबीसी पुरुष), प्रभाग 14 ब – सुरेखा कैलास भोसले, प्रभाग 15 – सुवर्णा जाधव (ओबीसी महिला), प्रभाग 15 – विद्या खैरे (सर्वसाधारण महिला), प्रभाग 14 क – रेखा नेहूल भंडारी, प्रभाग 15 अ – परसराम बाळू गायकवाड प्रभाग 15 – अनिल शिंदे (सर्वसाधारण), प्रभाग 15 अ – परसराम बाळू गायकवाड, प्रभाग 17 – मोहिनी संजय लोंढे (ओबीसी महिला), प्रभाग 17 – दिलीप सातपुते (सर्वसाधारण)