नगरमध्ये रंगणार राज्य अंजिक्यपद निवड चाचणी कबड्ड्री स्पर्धा

250

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना आयोजित 31 वी किशोर गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुले व मुली दिनांक 23 जानेवारी ते 25 जानेवारी रोजी रेसिडेन्शिअल हायस्कूल मैदानावर होणार असल्याची माहीती कबड्डी असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

महाराष्ट्रातील 25 जिल्हे या स्पर्धामध्ये सहभागी होणार आहेत. 25 मुले 25 मुली एकूण पन्नास संघ येणार आहेत. जवळपास साडेसहाशे खेळाडू दीडशे पंच कोच राज्यातून येणार आहेत. या स्पर्धा सहा मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. दहा हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरीची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर येथून गॅलरी मागवली आहे. नगर जिल्ह्यातील सर्व कबड्डी शोकीन खेळाडूंना सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावे. स्पर्धेतील सर्व सामने प्रथम साखळी नंतर बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. विजेते संघाना ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. ही स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेमधून राज्याचे मुलं व मुलींचे संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या