
नागापूर, एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून फोडून टायरची चोरी करणारे तीन आरोपी दोन ट्रकसह कळंब येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहेत.बिभीषण राजाराम काळे, बालाजी छगन काळे आणि सुनिल नाना काळे अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, .6 डिसेंबर 2019 रोजीचे रात्रीचे वेळी नागापूर, एमआयडीसी येथील एमआरएफ टायरचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून गोडावून मधील 17,98.286/-रु. कि.चे एमआरएफ कंपनीचे ट्रकचे व मोटार सायकलचे टायरची चोरी करून नेले होते. परंतू, टायर घेवून न जाता आल्याने चोरट्यांनी गोडावून काढलेले टायर गोडावून जवळच असलेल्या नदीपात्रात झुडुपामध्ये लपवले होते. मात्र चोरट्यानीं यातील 96,000/-रु. किंमतीचे सहा टायर चोरुन नेले होते. सदर घटनेबाबत गोडावूनचे सुपरवायझर शिवचगणदास दिनाबंधूदास यांनी एमआयडीसो पो.स्टे.येथे दिलेल्या फिर्यादीवरुन भादवी कलम 457, 380 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करुन या तीन आरोपींना उस्मानाबाद येथे अटक केली आहे.

































































