नगर अर्बन बँक बुडविणाऱयांना मोठा धक्का, माजी अध्यक्षांसह संचालकांची 100 कोटींची मालमत्ता जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar urban bank fraud case co-operative bank scam district court judgement

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बुडविण्यास कारणीभूत असणाऱया भ्रष्ट पदाधिकारी आणि अधिकाऱयांविरुद्ध राज्य शासनाने कठोर पावले उचलून बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि काही बडय़ा कर्जदारांच्या मालकीची सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्याची अधिसूचना 18 मार्च रोजी जारी केली आहे, अशी माहिती बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी व राजेंद्र चोपडा यांनी दिली. सहकार चळवळीला दिशा देणारा आणि भ्रष्टाचाऱयांना चपराक लगावणारा हा निर्णय मानला जात आहे. यावेळी समितीचे अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, एम. के. कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.