
हे देवेंद्र फडणवीसांचे सरकार आहे. ते स्वतः गृहमंत्री आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यामुळे जास्त कराल तर कापून काढू, अशी उघड धमकी भाजप आमदार आशीष देशमुख यांनी नागपूरमध्ये बोलताना विरोधकांना दिली आहे.
जिल्ह्यातील कळमेश्वर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात बोलताना आमदार देशमुख यांनी ही धमकी दिली आहे. दोन दिवसांआधी कळमेश्वरमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली होती. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराच्या पतीचे नाव पुढे आले होते. त्याला प्रत्युत्तर देताना आशीष देशमुख यांनी चंद्रशेखर बावनपुळे यांच्या उपस्थितीत ही भाषा वापरली आहे. विशेष म्हणजे कळमेश्वरची संस्कृती बिघडू नये अशी आमची भूमिका असल्याचेही ते भाषणात शेवटी म्हणाले.


























































