नागभीड तालुक्यात बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या

674

बलात्कार झालेल्या 16 वर्षीय पीडित मुलीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागभीड तालुक्यात कसर्ला इथे घडली. पीडित मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला वाचा फुटली असून या युवतीवर शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे 7 ऑगस्टला दोन युवकांनी बलात्कार केल्याचं उघड झालं. यामुळे व्यथित झालेल्या पीडित युवतीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. विहिरीत शनिवारी मृतदेह सापडल्यावर पोलिसांच्या हाती सुसाईड नोट लागली. मृत युवतीच्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून तपास सुरू आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या