
नागपुरातील मिहान भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका कारला ट्रेलरने उडवले. या अपघातात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिहान भागातील खापरी पुलावर झालेल्या या अपघाता कारमधील चौघे जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला. बालचंद उइके, पीयूष टेकाडे, नेहा गजभिये आणि पायल कोचे अशी मृतांची नावे आहेत. तर आशिष सरनायल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व कर्मचारी एग्जावेअर कंपनीतून काम संपवून कारने घरी परतत होते. सोनेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.






























































