…तर दहा मेट्रो प्रकल्प पांढरे हत्ती ठरतील! – जयंत पाटील

1195

नागपूरमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर त्या मेट्रोचा वापर अतिशय कमी लोक करतात. हीच परिस्थिती इतरही शहरांमध्ये थोडय़ाफार प्रमाणात पाहायला मिळेल. पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात येणारे मेट्रो प्रकल्प हे दहा वर्षांतच पांढरे हत्ती ठरतील आणि त्याचा बोजा राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर पडेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज दिली.

राज्याच्या गतिमान विकासासाठी दीर्घकालीन उपायांची गरज आहे. जयंत पाटील हे पुणे येथील स्व. राजाभाऊ चितळे स्मृती व्याखानात बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, ज्या राज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा राज्यांना केंद्र सरकारकडून मोठय़ा प्रमाणाकर मदत करण्यात येते, परंतु जी राज्ये वेगाने प्रगती करत आहेत अशा राज्यांना मात्र त्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत नाही. हा दुजाभाक कमी करण्यासाठी राज्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्या राज्यांना मदत केली पाहिजे. यासाठी केंद्रीय बजेट सादर करताना मागच्या कर्षीच्या बजेटमधून कोणत्या प्रकारचे रिझल्ट मिळाले त्यानुसार आऊटपुट बजेटही मांडण्यात आले पाहिजे.

मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी फार खर्च नाही
मंत्र्यांना देण्यात आलेल्या बंगल्यांमध्ये नवीन मंत्री आल्यानंतर त्यांच्या सोयीनुसार काही बदल करावे लागतात. त्यानुसार काम करण्यात येणार आहे; परंतु यासाठी जो खर्च सांगण्यात येत आहे तो फुगवून सांगण्यात येत असून त्यासाठी फार खर्च येणार नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पाच दिवसांच्या आठवडय़ामुळे पर्यटनाला चालना मिळेल!
सरकारी कर्मचाऱयांना पाच दिवसांचा कार्यालयांना कामकाजाचा आठवडा केल्यामुळे त्यांना आवडीच्या ठिकाणी फिरण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी वेळ मिळणार असून यामुळे राज्याच्याच पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या