मोदींचे भाषण बह गया स्वरूपाचे

पश्चिम बंगालमध्ये रविवारी पंतप्रधान मोदींचे भाषण ‘बह गया’, ‘बहक गया’ अशा स्वरूपाचे होते, अशा शब्दांत टीका करून सुप्रसिद्ध अभिनेते व माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मिथुन चक्रवर्ती यांना फक्त स्वतःच्या फायद्यासाठी भाजपने पक्षात घेतल्याचा आरोप केला. महिला दिनाच्या एका कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोदी यांच्या भाषणात डेप्थही नव्हती. लोकांच्या जीवनाशी निगडित बाबींवर ते बोलूच शकले नाहीत. जीडीपी, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलन हे ज्वलंत विषय टाळले. शेतकरी व जनतेला ‘दवा’ची नाही तर ‘दुवा’ आणि ‘मरहम’ची गरज होती. पश्चिम बंगालची जनता ममतांच्या पाठीशी आहे. त्यांची प्रतिमाही चांगली आहे. कडवा विरोधच लोकांमध्ये ममतांविषयी सहानुभूती निर्माण करण्याची शक्यता आहे, असे शत्रुघ्न म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या