
नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील सातगावमधील 336 कुटुंबांना बेघर केल्यामुळे ही कुटुंब गेल्या दहा दिवसांपासून हक्काच्या घरांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र याकडे नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साफ दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे ‘युवा – परिवर्तन की आवाज’ संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात फडणवीसांच्या घरासमोर संविधान पठण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. हा इशारा दिल्यानंतर निहाल पांडे व आंदोलनकांना धमक्या येऊ लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर व घरासमोर आंदोलन केल्यास तुमच्या सात पिढ्यांना लक्षात राहिल अशी अवस्था करू अशी धमकी निहाल पांडे व व आंदोलंकांना मिळत आहेत.

































































