फडणवीसच मुख्यमंत्री होणार!-नितीन गडकरी

1117

राज्यातील मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गुरुवारी नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गडकरी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची निवड सर्वानुमते झाली असल्याने त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हायला हवे. शिवेसेनेसोबत सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच त्याबाबत निर्णय होईल. आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण दिल्लीतच आनंदी आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात परतणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या