नागझिऱ्याच्या व्याघ्र प्रकल्पात दिसले पांढऱ्या रंगाचे सांबर

669

गोंदिया जिल्ह्यातील वनवैभवात विविध पक्ष्यांसह प्राण्यांची मोठय़ा प्रमाणात संख्या आहे. त्यातच फुलपाखरांच्या तर अनेक प्रजाती या जिह्यातील नागझिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्पाच्या भागात बघावयास मिळतात. त्यातच आता अर्जुनी मोरगाव तालुक्यात असलेल्या नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात दुर्मिळ असलेले पांढऱ्या रंगाचे सांबर आढळून आल्याने वन्यजीव विभागासह वन विभागात व वन्यप्रेमींमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झालेला आहे.

वनरक्षक हितेंद्र अनारसे यांना हे सांबर आढळले. यापूर्वी 2017 मध्ये गुजरातमधील गीरमध्ये असेच अल्बिनो सांबर आढळल्याची नोंद आहे. या पांढऱ्या सांबराचा कानाचा रंग हलका गुलाबी, पिंगट डोळे व तृण आच्छादित भूपृष्ठावर उठून दिसणारा असल्याची माहिती नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका पूनम पाटे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या