नाहूर उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nahur

नाहूर रेल्वे स्थानकाजवळील पालिकेच्या प्रस्तावित उड्डाणपूल कामात अडथळा ठरणारी ओव्हर हेड वायर आता भूमिगत टाकली जाणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पुलाचे रखडलेले काम मार्गी लागणार असून रेल्वे प्रवासी आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ही वायर भूमिगत टाकणार असून त्यासाठी साडेतीन कोटींचा खर्च येणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम सुरू आहे. मार्गावरील नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या उतार मार्गाचे विस्तारीकरण आणि पुनर्बांधणी करण्यासाठी पालिकेने 2018 मध्ये कंत्राटदाराची नेमणूक केली. परंतु, पुलाच्या कामात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (एमएसईबी) 22 के.व्ही. क्षमतेच्या ओव्हरहेड हाय टेन्शन वायरमुळे काम रखडले हेते. त्यामुळे प्रशासनाने वायर बाजूला करण्याचा निर्णय घेतला.